पातूर येथे युवा सेनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत CET मॉक टेस्ट परीक्षेचे आयोजन

पातूर येथे युवा सेनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत CET मॉक टेस्ट परीक्षेचे आयोजन

पातूर (दि. 29 मार्च 2025) – युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून

आणि युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई, शिवसेना उपनेते आमदार नितीन

बापू देशमुख यांच्या आदेशाने पातूर येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत CET मॉक टेस्ट परीक्षा आयोजित करण्यात आली.

Related News

ही परीक्षा युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेना विभागीय सचिव सागर देशमुख,

शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

परीक्षेचे आयोजन आणि सहभाग

ठिकाण – सिन्हा महाविद्यालय, पातूर
वेळ – शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1
विद्यार्थी सहभाग – 400 हून अधिक विद्यार्थी

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन

▪️ डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण खंडारे आणि

    प्रा. डॉ. रोनिल आहाळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


▪️ प्रा. जयेंद्र बोरकर, योगेंद्र बोरकर, प्रा. शंकर गाडगे, प्रकाश सोनोने,

    प्रा. मिलिंद वाकोडे, अमानकर सर यांनी परीक्षेच्या आयोजनात मोठी जबाबदारी पार पाडली.


▪️ युवासेना विस्तारक अजय घोडके, तालुकाप्रमुख रवींद्र मुर्तळकर, शहरप्रमुख निरंजन बंड,

   उपशहरप्रमुख सचिन गिऱ्हे, विशाल तेजवाल, योगेश लांडगे, राहुल गवई,

    प्रतीक पाटील, आकाश राऊत यांचीही परीक्षेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका होती.

शांततेत पार पडलेली परीक्षा

परीक्षा अत्यंत शांततेत पार पडली आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना CET परीक्षेची पूर्वतयारी करण्यास मोठा फायदा होणार आहे.

Related News