पातूर तालुक्यात ६० वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; पोलीस तपासात गुंतले

पातूरमध्ये ६० वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या

अकोला |

पातूर तालुक्यातील पातूर-तुळजापूर रस्त्यालगत असलेल्या गावठाण परिसरात एका ६०

वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना काल (रविवार) रात्री उघडकीस आली आहे.

Related News

सै. जाकीर सै. मोहिद्दीन (वय ६०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी रात्रीच्या अंधारात संपूर्ण गावठाण व परिसराची कसून पाहणी केली.

मृताच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहता ही हत्या अत्यंत निर्घृण आणि नियोजनपूर्वक

करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सध्या पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

हत्या कुठल्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतकाचे कोणाशी वैयक्तिक वाद होते का?

हत्या सूडबुद्धीतून झाली का? की यामागे आर्थिक किंवा कौटुंबिक कारण आहे?

— याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक पातूर शहरात विशेष पथकाच्या मदतीने तपास सुरू ठेवत आहेत.

Related News