पातुर, नंदापूर (विकास ठाकरे) : पेरणीच्या काळात आलेल्या अल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचे संकट भोगावे लागले.
काही शेतकऱ्यांची बियाणे न निघाल्याने शेती कोरडीच राहिली.
मात्र गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे सुकलेली पिके आता बहरू लागली आहेत.
कपाशी, सोयाबीन, तूर, मुग, उडीद या पिकांची मशागत शेतकऱ्यांनी पुन्हा सुरू केली असून,
जंगली डुक्कर व रोहीपासून पीक संरक्षणासाठी शेतकरी रात्रंदिवस सतर्क आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विम्याची मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असली,
तरी वाढलेल्या विमा हप्त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी अडचणीत आले आहेत.
शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे होतील की नाही, याचीही चिंता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/cow-stolen-skepticism-dalit-youth/