३ आरोपींवर अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल, १ आरोपी अटकेत! – SP निलेश तांबे
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रहिवासी रोहन संतोष पैठणकर (वय २१) या दलित युवकाला
जुलै महिन्याच्या रात्री बसस्थानकाजवळ उभा असताना, गब्बू गुजरीवाल आणि प्रशांत गोपाल संगेले
या दोघांनी जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून काँग्रेस भवनाजवळ नेले आणि दगडाने बेदम मारहाण केली.
इतक्यावरच न थांबता त्यांनी त्याचे कपडे आणि चड्डी काढण्याचा प्रयत्न केला, रोहनने माफी मागूनसुद्धा त्यांनी मारहाण थांबवली नाही.
त्याच्या अंगावर गायी सोडल्या आणि याचा व्हिडिओ शूट केला.
नंतर पुन्हा त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून घाटपुरी नाक्याजवळील
मोकळ्या मैदानात नेऊन लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.
तेव्हा रोहित पगारिया नावाचा त्यांचा मित्र तिथे आला आणि त्यानेसुद्धा रोहनला मारहाण केली.
यानंतर इतर काही तरुणांनाही तिथे बोलावण्यात आले.
रोहनने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी त्याला विचारत होते की “इमरान कोण आहे?”
आणि “हा गाय चोर आहे” असे म्हणून त्याला मारहाण करत होते.
याच दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहोचले.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गब्बू गुजरीवाल, प्रशांत गोपाल संगेले
आणि रोहित पगारिया यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटने मध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे या संदर्भात
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अजिंक्य भारत न्यूज शी बोलताना माहिती दिली.
Read Also :
