पतीची लैंगिक समस्या, पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने मित्राला सांगितले अन्… पुण्यात नेमकं चाललंय काय?

पतीची लैंगिक समस्या, पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने मित्राला सांगितले अन्… पुण्यात नेमकं चाललंय काय?

पुण्यात एका पतीने आपल्या पत्नीला मूल व्हावे म्हणून आपल्या मित्राला तिच्यासोबत शरीरसंबंध

ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पत्नीने पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.

Related News

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

त्यातच आता पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील एका पतीने पत्नीला मूल व्हावे आणि आपले पौरुषत्व जगाला दिसावे यासाठी

मित्रालाच पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी घरी बोलावल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

पतीच्या मित्राने पत्नीला फोन करून सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पत्नीने पती आणि त्याच्या मित्राविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील असून तिचा पती सांगलीचा आहे.

सध्या तो पुण्यातच स्थायिक आहे. महिलेने तक्रारीत नमूद केल्याप्रकरणी सांगलीत

नांदत असताना तिचे पतीसोबत वारंवार खटके उडत होते. यामुळे तो तिला मारहाण करत होता.

या कारणामुळे सहा महिन्यांपूर्वी ती माहेरी निघून गेली होती. जुलै २०२३ मध्ये जेव्हा ती आणि तिचा

पती एकत्र राहत होते, तेव्हा पती त्याच्या एका मित्राला घरी घेऊन आला होता.

त्यावेळी पतीचा मित्र तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता, असे तिने पतीला सांगितले.

यावरून पतीने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर ती माहेरी निघून आली. या घटनेनंतर,

१७ फेब्रुवारी २०२५ पासून पतीचा तो मित्र महिलेला वारंवार मेसेज करत होता.

त्याच्या वारंवार येणाऱ्या मेसेजकडे तिने दुर्लक्ष केले. मात्र, १ मार्चला त्या मित्राने तिला फोन केला आणि धक्कादायक माहिती दिली.

त्याने त्या महिलेला सांगितले की, तुझ्या पतीने मला तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी सांगितले होते.

तुझ्या पतीचा लैंगिक समस्या आहेत, असेही त्याने तिला सांगितले. तुझा पती नपुंसक असल्याने

आणि तिला मूलबाळ व्हावे या उद्देशानेच त्याने मला तुझ्यासोबत शरीरसंबंधासाठी पाठवले होते,

असे तिच्या पतीच्या मित्राने सांगितले.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

या धक्कादायक खुलासामुळे त्या महिलेला धक्का बसला. तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

याप्रकरणी पती आणि त्याच्या मित्राविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली.

सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related News