बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले तंबाखू मुक्त पथनाट्य हे समाजप्रबोधनात्मक असून त्यातून प्रभावी जनजागृती होते,
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
शास्ती पुर्ण माफ करण्याचा प्रस्ताव पाठवा
असे गौरवोद्गार जिल्हा दिवाणी न्यायाधीश (उच्च स्तर) श्रीमती आर. एन. बंसल यांनी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किरणभाऊ नाईक होते.
व्यासपीठावर ठाणेदार अनिल गोपाळ, लोकअभिरक्ष श्री एन. आर. उंबरकर, अॅड. अक्षय डोंगरे, अॅड. उन्हाळे,
शाळा समितीचे अध्यक्ष दीपकभाऊ नाईक, संस्था सचिव एन. एस. गमे, मुख्याध्यापक मनोज आगरकर,
उपमुख्याध्यापक गजानन पोहनकर, पर्यवेक्षक शंकर भदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अमली पदार्थांविरोधात कायदेविषयक मार्गदर्शन
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अमली पदार्थ तस्करी प्रतिबंधक कायदे,
POCSO कायदा आणि त्यांचे समाजातील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तंबाखू व अमली पदार्थविरोधी पथनाट्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
उत्कृष्ट अभिनयाबद्दल प्रा. वासुदेव डांगे, प्रा. रमेश भड आणि विद्यार्थ्यांचा न्यायाधीश आर. एन. बंसल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संदेश
किरणभाऊ नाईक यांनी अध्यक्षीय मनोगतात अमली पदार्थांचे दुष्परिणाम उलगडून सांगत विद्यार्थ्यांना सजग राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश भड यांनी केले तर आभार प्रा. आशिष बोरोडे यांनी मानले.
यावेळी प्राचार्य प्रणाली अंबरते, प्रा. गजानन कंकाळ, विक्रमसिंग पवार, वैशाली राय आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण बागडे, कैलास गोवर्धने, सय्यद उमेर, विकी बागडे, भूषण खापरकर, उमेश गावंडे आदींनी मोलाचे योगदान दिले.
Read Also : https://ajinkyabharat.com/bordi-grampanchayati-bhang/