पॅरालिम्पिक 2024 चा आज समारोप!

टोकियोमध्ये भारताने 19 पदकांची कमाई केली होती. 19

मेडलसह भारत मेडल टॅलीमध्ये 26 व्या क्रमांकावर राहिला होता.

यंदा पॅरिस पॅरालिम्पिकच्या सुरुवातीच्या दिनापासून भारताने

Related News

दमदार कामगिरी करत टोकियोमधील मेडल टॅलीचा रेकॉर्ड मोडला

आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने 10 दिवसात 29 पदकांची

कमाई केली आहे. त्यामुळे भारताच्या मेडल टॅलीमध्ये वाढ झाली

असून भारत 16 व्या क्रमांकावर आहे.

28 ऑगस्ट रोजी पॅरालिम्पिक खेळांना सुरूवात झाली होती. आज

8 सप्टेंबर रोजी पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोप होत आहे. यंदाच्या

पॅरालिम्पिमध्ये भारताने 29 पदके आपल्या नावे केली. ज्यात 7

सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कास्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नवदीप सिंग,अवनी लेखरा, नितेश

कुमार, हरविंदर सिंग, प्रवीण कुमार यांनी बाजी मारत भारताच्या

झोळीत सुवर्ण पदके जमा केली.

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताची पदकतालिका

1 अवनी लेखरा – 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 (शूटिंग) सुवर्ण

2 मोना अग्रवाल -10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 (शूटिंग) कांस्य

3 प्रीथी पाल – 100 मीटर T35 (ॲथलेटिक्स) कांस्य

4 मनीष नरवाल – 10 मीटर एअर पिस्तूल SH1 (शूटिंग) रौप्य

5 रुबिना फ्रान्सिस- 10 मीटर एअर पिस्तूल SH1 (शूटिंग) कांस्य

6 प्रीथी पाल- 200 मीटर T35 (ॲथलेटिक्स) कांस्य

7 निषाद कुमार – उंच उडी T47 (ॲथलेटिक्स) रौप्य

8 योगेश कथुनिया – डिस्कस थ्रो F56 (ॲथलेटिक्स) रौप्य

9 नितेश कुमार – एकेरी SL3 (बॅडमिंटन) सुवर्ण

10 तुलसीमाथी मुरुगेसन – महिला एकेरी (बॅडमिंटन) रौप्य

11 मनीषा रामदास – महिला एकेरी SU5 (बॅडमिंटन) कांस्य

12 सुहास यथीराज – पुरुष एकेरी SL4 (बॅडमिंटन) रौप्य

13 राकेश कुमार / शीतल देवी मिश्र – संघ कंपाऊंड खुला (तिरंदाजी) कांस्य

14 सुमित अँटील – भालाफेक F64 (ॲथलेटिक्स) सुवर्ण

15 नित्या श्री सिवन – एकेरी SH6 (बॅडमिंटन) कांस्य

16 दीप्ती जीवनजी- 400 मीटर T20 (ॲथलेटिक्स) कांस्य

17 सुंदर सिंग गुर्जर – भाला F46 (ॲथलेटिक्स) कांस्य

18 अजित सिंग – भाला F46 (ॲथलेटिक्स) रौप्य

19 मरियप्पन थांगावेलू – उंच उडी T63 (ॲथलेटिक्स) कांस्य

20 शरद कुमार – उंच उडी T63 (ॲथलेटिक्स) रौप्य

21 सचिन खिलारी – शॉट पुट F46 (ॲथलेटिक्स) रौप्य

22 हरविंदर सिंग – वैयक्तिक रिकर्व्ह (तिरंदाजी) सुवर्ण

23 धरमबीर – क्लबने 51 (ॲथलेटिक्स) सुवर्ण फेकले

24 प्रणव सूरमा – क्लबने 51 (ॲथलेटिक्स) रौप्य फेकले

25 कपिल परमार – ज्युडो पुरुष 60 किलो J1 कांस्य

26 प्रवीण कुमार – T64 उंच उडी (ॲथलेटिक्स) सुवर्ण

27 होकाटो सेमा – शॉट पुट F57 (ॲथलेटिक्स) कांस्य

28 सिमरन सिंग – 200 मी – T12 कांस्य

29 नवदीप सिंग – भाला F41 सुवर्ण

Read also: https://ajinkyabharat.com/death-toll-in-lucknow-transport-nagar-accident-is-8/

Related News