पानविडा कायमच,भेंडवळच्या घट मांडणीत उघडले भाकीत

भेंडवळ

जळगाव जामोद : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भाकित आज जाहीर करण्यात आले. राजा कायम राहणणार की बदलणार याची उत्सुकता भेंडवळ भाकिताच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला लागलेली असतना पाणविडा कायम असल्याची माहिती सारंगधर महाराज वाघ व पुंजाजी महाराज वाघ यांनी दिली. पानविडा हे गणपतीचे प्रतीक असून पानविडा कायम राहणार असे सांगताना राजा कायम राहणार की बदलणार या प्रश्नाला मात्र वाघ महाराजांनी निवडणूक आचारसंहितेमुळे बगल दिली.
संपूर्ण देशभरात भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध असून या घटमांडणीला साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे. या घटमांडणीवर शेतकरी वर्ग विश्वास ठेवून शेती करत असतो. यावेळी या मांडणीमध्ये गहू, हरभरा आणि वाटाणा हे सर्वोत्कृष्ट पीक म्हणून सांगण्यात आले आहे.

तर इतर पिकांमध्ये ज्वारी आणि कापूस हे मध्यम पेक्षा अधिक चांगलं पीक राहील, असं सुद्धा भाकीत सांगण्यात आले. सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे राजकारणामध्ये ज्यांना रुची आहे आणि अनेक राजकारणी लोक हे भाकीत ऐकण्या करता येथे आली होती.

कारण या संपूर्ण अठरा प्रकारच्या कडधान्यांच्या मधात जो कळस ठेवला जातो आणि त्याच्या आजूबाजूला जे खाद्यपदार्थ ठेवले जातात त्यासोबत राजाचं प्रतीक म्हणून पानविडा सुद्धा ठेवला जातो, त्यावरून भाकीत किंवा भविष्यवाणी ठरत असते. आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी राजा कायम असं न म्हणता पान सुपारी ही योग्य आहे, असं म्हटल्याने त्या दृष्टिकोनातून अनेक लोकांनी आपापले मत काढत आपापल्या परीने त्याची व्याख्या केली.

मागील 350 वर्षांची ही परंपरा असून वैकुंठवासी चंद्रभान महाराजांंच्या वंशातील सारंगधर महाराज आणि पुंजाजी अक्षय तृतीयेच्या दिवशी ही घट मांडणी करतात आणि दुसऱ्या दिवशी हे सर्व भाकीत निघत असते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे दत्ता पाटील यांनी भेंडवळ घटमांडणी यावर राजकीय भाष्य करीत केंद्रातील मोदी सरकारला यावेळेस टेकू ची गरज भासेल. पंतप्रधान मोदी यांची पूर्ण बहुमतात यावेळेस सत्ता येणार नाही. तर यावेळी मित्रपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल. यावेळी या घटमांडणीला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी आले होते.