पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;

नवी दिल्ली |

पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7, लोक कल्याण मार्ग, दिल्ली येथील

आपल्या निवासस्थानी ‘सिंदूर’ वनस्पतीचे (Bixa orellana) रोपण केले.

Related News

हे रोप त्यांना अलीकडील कच्छ दौऱ्यादरम्यान 1971 च्या युद्धातील वीरांगनांकडून भेट स्वरूपात मिळाले होते.

वीरांगनांच्या भावना पाहून मोदी भावूक झाले आणि त्यांनी ते रोप स्वतःच्या निवासस्थानी लावण्याचे आश्वासन दिले होते.

या वनस्पतीचे बीज लाल-नारंगी नैसर्गिक रंगासाठी प्रसिद्ध आहे. याचा वापर सिंदूर,

रंग, लिपस्टिक आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. यामध्ये अँटीबायोटिक व

अँटीसेप्टिक गुणधर्म असल्यामुळे ही वनस्पती त्वचारोग, ताप आणि उच्च रक्तदाबावर प्रभावी ठरते.

पंतप्रधान मोदींनी यावेळी सोशल मीडियावरून एनडीए सरकारच्या

कल्याणाच्या धोरणांची देखील माहिती दिली आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

Read Also : https://ajinkyabharat.com/gajanan-maharaj-palkhi-sobat-business-and-waricha-unique-sangam/

Related News