पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन – खांबोरा पाणीपुरवठा योजना अपयशी

पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन – खांबोरा पाणीपुरवठा योजना अपयशी

खारपणपट्टी: खारपणपट्ट्यातील बारूला विभागातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

निर्माण झाली असून ग्रामस्थांना १५ ते २० दिवसांआड पाणी मिळत आहे.

खांबोरा पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात आली असली तरीही पुरवठा

Related News

सुरळीत न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.

७३ कोटींची योजना अपयशी?

खांबोरा पाणीपुरवठा योजनेच्या ७३ कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या कामांपैकी

१००% कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

मात्र, तरीही या भागातील १५ ते २० गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

ग्रामस्थांचा इशारा – मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन

यावेळी ग्रामस्थ पवन बुटे आणि दिलीप मोहोड यांनी किमान तीन दिवसाआड

तरी नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.

अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Related News