पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडले भुयार, पाहा आतमध्ये काय काय मिळाले

विठ्ठल मंदिरात

पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात संवर्धनाचे काम सुरु असताना एक तळघर सापडले आहे. या तळघरात आता नेमके काय काय सापडते

याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत यातून एक मूर्ती, काही नाणी आणि पादुका सापडल्या आहेत.

Related News

पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडले आहे. या तळघरांमध्ये पुरातन मूर्ती तसेच जुन्या

वस्तू सापडण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसेच मंदिर

समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत येथे काम सुरु आहे. तळघरात काय

सापडणार याकडे  संपूर्ण विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत यामध्ये विष्णूची मूर्ती, पादुका,

एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती आहे. हे तळघर आणखी किती खोल आहे हे पाहिले जात आहे.

६ फूट खोल तळघर

विठ्ठल मंदिरात सध्या संवर्धनाचे काम सुरु आहे. या दरम्यान हे तळघर सापडले आहे.

या तळघराचा रस्ता कुठपर्यंत जातो याची देखील माहिती घेतली जात आहे.

विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांचं सर्वात मोठं देवस्थान आहे. येथे दरवर्षी लाखो लोकं विठ्ठलाच्या

भेटीला येत असतात. पंढरपूरची वारी देखील जगभरात चर्चेत असते.

याच मंदिरात दर्शनासाठी लोकं अनेक तास रांगा लावतात.

Read Also https://ajinkyabharat.com/akhkhan-family-is-in-the-custody-of-police-investigation-will-be-done-on-the-police/

Related News