मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे,
शिवाय उजनी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनीत
येणाऱ्या विसर्गात मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
दरम्यान, उजनी अन् वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात
पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागेच्या तीरावर असलेलया व्यास
नारायण झोपडपट्टीत पाणी शिरल्याने येथील नागरिकांना स्थलांतरीत
करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. उजनीतून भीमेत ८० हजार
क्यूसेकचा विसर्ग तर वीरमधून नीरा नदीत ६३ हजाराचा विसर्ग सुरू आहे.
उजनी धरणाची पाणीपातळी सध्या १०७.७ टक्के एवढा आहे. सीना माढा,
दहिगांव, मुख्य कॅनॉल, वीजनिर्मिती, नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
दोन ते तीन दिवसांपासून दौंडमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे.
त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे
पंढरपुरातील भीमा नदीला पूर आला असून पुरामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे.
सतर्कतेच्या दृष्टीने प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. बाधित परिसरातील
नागरिकांना सुरक्षेच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.