पंचायत समिती कार्यालयाजवळ दुचाकीला भीषण आग

पंचायत समिती कार्यालयाजवळ दुचाकीला भीषण आग

अकोला शहरातील पंचायत समिती कार्यालयाजवळ एका उभ्या असलेल्या दुचाकीला

आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. पंचायत समिती कार्यालयासमोर दुचाकी

गाड्या दुरुस्तीची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. येथील एका दुकानावर एका ऍक्टिवा दुचाकीची सर्व्हिसिंग सुरू

Related News

असतानाच अचानक या दुचाकीने पेट घेतला. दरम्यान यावेळी स्थानिकांनी

आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली आहे. तर अगदी हाके भराच्या

अंतरावर अग्निशमन विभागाचे कार्यालय देखील आहे. काही वेळानंतर

अग्निशमन विभागाच्या जवानांकडून आग विझवण्यात आली आहे.

दरम्यान वर्दळीच्या मार्गावर ही आगीची घटना घडल्याने सर्वत्र मोठी धावपळ उडाली होती.

Read more news here : https://ajinkyabharat.com/tya-vidiulil-khushene-jarange-patil-sangle-paha-khas-meeting/

 

Related News