पाकिस्तानच्या हाती असलेले अण्वस्त्र सुरक्षित आहेत का?

पाकिस्तानच्या हाती असलेले अण्वस्त्र सुरक्षित आहेत का?

श्रीनगर | राष्ट्रीय सुरक्षा विशेष वार्ता

पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत जगभरात शंका आणि चर्चा सुरू असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

यांनी श्रीनगरमधून जागतिक समुदायासमोर थेट प्रश्न उपस्थित केला आहे –

Related News

“अशा गैरजबाबदार आणि कपटी राष्ट्राच्या हाती अण्वस्त्र सुरक्षित मानावीत का?”

पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र गळती? अफवा आणि अधिकृत खुलासे

अलीकडेच सोशल मीडियावर पाकिस्तानमध्ये ‘न्यूक्लिअर लिकेज’ (अण्वस्त्र गळती) झाल्याच्या

बातम्या झपाट्याने पसरल्या होत्या. मात्र, काही तासांतच IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) ने स्पष्ट केलं की, कोणतीही गळती झालेली नाही.

 राजनाथ सिंह यांची मोठी मागणी

राजनाथ सिंह यांनी श्रीनगरहून घोषीत केलं की,

पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली (IAEA) पुनर्विचार व्हावा.

ते म्हणाले की,

“पाकिस्तानने अनेकदा भारताला अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या आहेत. हे देश अण्वस्त्रांबाबत

अतिशय गैरजबाबदार पद्धतीने वागत आहे. अशा देशाच्या हाती अण्वस्त्र असणं ही जगासाठी मोठी जोखीम आहे.”

 ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख – “आम्ही कर्म पाहून मारलं”

राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सांगितलं की,

“पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म पाहून भारतीयांना मारलं, पण आम्ही कर्म पाहून त्यांना संपवलं.

पहलागाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला.

त्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा जम्मू-कश्मीर दौरा झाला.

🇮🇳 सैनिकांप्रती कृतज्ञता – “मी एक डाकिया बनून आलोय”

सैनिकांना उद्देशून ते म्हणाले –

मी इथे एक मंत्री म्हणून नव्हे, तर देशाचा नागरिक आणि डाकिया बनून आलोय.

देशवासियांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि कृतज्ञता तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आलोय. आम्हाला आमच्या सैन्यावर अभिमान आहे.

पाकिस्तानसोबत संवाद? – फक्त POK आणि दहशतवादावरच

राजनाथ सिंह म्हणाले की,

“पाकिस्तानसोबत संवाद फक्त पाकिस्तानव्याप्त कश्मीर (POK) आणि दहशतवादाच्या मुद्यावरच होऊ शकतो. चर्चा आणि दहशतवाद एकत्र शक्य नाही.”

Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-air-strikean-pakchaya-chindhya-chindhya/

Related News