पाकिस्तानचे विधान

अणुकार्यक्रमाचा थेट इशारा

पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत केलेल्या संरक्षण करारामुळे अमेरिकेपासून इस्त्रायलपर्यंत खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय तणाव अधिकच वाढला आहे.

काय आहे करार?

या करारानुसार, पाकिस्तानवर हल्ला म्हणजे थेट सौदी अरेबियावर हल्ला मानला जाईल. पाकिस्तान यानंतर आणखी काही मुस्लिम देशांसोबत असे करार करण्याच्या तयारीत आहे.

अणुकार्यक्रमाचा थेट उल्लेख

ख्वाजा आसिफ यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक दावा केला. त्यांनी सांगितले की, सौदी अरेबियाला पाकिस्तान आपला अणुकार्यक्रम पुरवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, हे विधान थेट इस्रायलसाठी इशारा आहे.

 पार्श्वभूमी

कतारवरील हमासच्या तळांवर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर अरब देशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

मध्यपूर्वेत इस्रायल हा एकमेव अण्वस्त्रधारी देश मानला जातो.

पाकिस्तानच्या दाव्यानुसार, सौदी अरेबियाने पूर्वी त्यांच्या अणुप्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.

 भारताची डोकेदुखी?

भारताविरुद्ध जर पाकिस्तान युद्ध छेडले, तर या करारामुळे सौदी अरेबियाही प्रत्यक्ष युद्धात उतरू शकतो का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र भारताने स्पष्ट केले आहे की, देशाची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.

read also :https://ajinkyabharat.com/natewaikansokabat-firala-janyacha-program-threel/