दुबई : आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात बांगलादेशने चिवट गोलंदाजी करत पाकिस्तानला फक्त 135 धावांवर रोखलं. आता अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी बांगलादेशला 136 धावांचा पाठलाग करायचा आहे.पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरला बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगलंच छळलं. सलामीवीर लवकर परतल्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव आला. काही कॅचेस सोडूनही बांगलादेशने सातत्याने झटके देत पाकिस्तानची धावसंख्या कमीच ठेवली. शेवटी पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावत 135 धावा केल्या.दरम्यान, टीम इंडियाने आधीच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे पाकिस्तान-बांगलादेश यापैकी कोण विजयी ठरणार, हेच फायनलचं समीकरण ठरवणार आहे. बांगलादेश 136 धावा करून फायनलमध्ये भारतासमोर उभा राहतो का, की पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
निर्णायक क्षण जवळ – काही तासांतच मिळणार फायनलिस्टचा खुलासा !
read also : https://ajinkyabharat.com/fund/
