नवी दिल्ली :
काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानकडून झालेल्या भीषण दहशतवादी
हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.
Related News
यूपीमध्ये कामकाजी महिलांसाठी योगी सरकारकडून मोठी सौगात
प्रादुर्भाव टाळण्यासाठी भुईमूग काढणीवेळी घ्यावयाची काळजी
भारताच्या मदतीनंतरही तुर्कीचा पाकिस्तानला लष्करी पाठिंबा
भोपालमध्ये युवकाचा नशेत धिंगाणा
उन्हाळ्यात आइसक्रीमच्या मागणीत वाढ, पण सावध!
अकोल्यात पोलिसांचे धडाकेबाज कोंबिंग ऑपरेशन;
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर शेतकऱ्यांचा रोष;
अकोल्यात चोरट्यांचा देवस्थानावर हल्ला
१६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी
भारत-फ्रान्समध्ये 63 हजार कोटींच्या राफेल डीलवर आज शिक्कामोर्तब
किसान हार्डवेअर दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान
जालौन : मोमोजवरून वाद, मुलींची रस्त्यातच तुंबळ मारामारी
या क्रूर घटनेनंतर भारताने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ माजला असून, तिथल्या लष्करातही जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख गायब :
हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर गायब झाल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
त्यांच्या बेपत्ता होण्यामागची नेमकी कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
ही बाब पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांसाठी आणि लष्करासाठी मोठी चिंता निर्माण करणारी ठरत आहे.
5000 पेक्षा अधिक सैनिकांनी दिला राजीनामा :
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या संभाव्य कठोर प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तानमध्ये गडबड उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन दिवसांत पाकिस्तानच्या सुमारे 5000 अधिकारी आणि सैनिकांनी लष्करातून राजीनामा दिला आहे.
ही घटना पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेतील अस्थिरतेचे गंभीर लक्षण मानली जात आहे.
पाकिस्तान लष्करावर प्रश्नचिन्ह :
भारताकडून होऊ शकणाऱ्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये घबराट पसरली असून,
लष्कराची एकगठ्ठता आणि शिस्त यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,
अशा स्थितीत पाकिस्तानला अंतर्गत बंडखोरी व जागतिक स्तरावर अपमान सहन करावा लागू शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharat-francesmadhy-63-thousand-kotinchya-rafael-delvar-today-shikkamortab/