अन्यथा ‘भारत बंद’ पेक्षाही मोठे आंदोलन करू

केंद्र सरकारला

केंद्र सरकारला संघटनांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती आणि जमाती

आरक्षणात काही जातींना वेगळे आरक्षण देण्यासाठी वर्गीकरण करता

Related News

येईल, असा निकाल दिला. या निकालाच्या विरोधात देशभरातल्या

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या संघटनांनी एकत्र येत २१ ऑगस्ट रोजी

‘भारत बंद’चे आंदोलन पुकारले होते.

अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाला संविधानाच्या नवव्या परिशिष्टात

टाकावे, जेणेकरून भविष्यात पुन्हा कधीही त्याला न्यायालयात आव्हान देता येणार

नाही, अशी मागणी या भारत बंद आंदोलनाद्वारे करण्यात आली. आता पुढील

हिवाळी अधिवेशनात यासंबंधी कायदा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

जर केंद्र सरकारने कायदा केला नाही, तर भारत बंद पेक्षाही मोठे आंदोलन

उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. देशभरातील अनुसूचित

जाती- जमातीच्या विविध संघटनांनी एकत्र येत नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ

दलित आणि आदिवासी ऑर्गनायझेशन या नावाखाली एकत्र येऊन

२१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ पुकारला होता.

Read also: https://ajinkyabharat.com/arvind-kejriwalancha-turungatala-mukkam-wadhala/

Related News