नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी
खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट)
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
कृषी सहायकांचा एकदिवसीय काम बंद आंदोलन;
प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्यात थेट फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून नेमलेले खासदारांचे हे गट विविध राष्ट्रांना भेट देऊन भारताच्या ऑपरेशन
सिंदूरमधील भूमिकेचे स्पष्टीकरण देणार आहेत. या शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश करण्यात आला असून,
शिवसेनेने या पुढाकाराचे स्वागत करत दहशतवादाविरोधातील लढ्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्र सरकारला दिले आहे.
शिष्टमंडळ हा कोणत्याही राजकीय हेतूने नसून, केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केल्यानंतर,
उद्धव ठाकरे यांनी “आपण देशासाठी आवश्यक ते सहकार्य करू,” असे केंद्रीय मंत्र्यांना सांगितले.
शिवसेना (ठाकरे गट) यांची भूमिका स्पष्ट करताना असेही सांगण्यात आले की,
“देशात गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न विचारले जातील,
पण जागतिक स्तरावर पाकिस्तानमधील दहशतवादाचे वास्तव उघड करणे, त्याला एकटे पाडणे आणि नष्ट करणे आवश्यक आहे.”
शिवसेनेने यावेळी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या
विषयावर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली.
तसेच अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळांबाबत सर्व राजकीय पक्षांना सविस्तर माहिती देण्यात यावी,
अशी सूचना देखील करण्यात आली.
भारत सरकारचा उद्देश —
खासदारांच्या माध्यमातून विविध देशांमध्ये जाऊन भारताच्या दहशतवादाविरोधातील स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडणे,
आणि जागतिक सहमती मिळवून पाकिस्तानस्थित दहशतवादाचा बंदोबस्त करणे हा असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pooja-meshram-yanani-international-level-akolyacha-jhanda-fadkavala/