नवी दिल्ली | 8 मे 2025 — पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) मध्ये भारतीय लष्कराने 6-7
मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केल्यानंतर देशात
आणि सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर
Related News
S-400 ‘सुदर्शन चक्र’ची किमया!
ऑपरेशन सिंदूरवर सीएम योगींची स्पष्ट भूमिका
ऑपरेशन सिंदूरवर संसदेतील सर्वदलीय बैठक सुरू
ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याच्या दरात उसळी;
ऑपरेशन सिंदूरवर जागतिक पाठिंबा,
अकोल्यात दहशतवादी हल्ल्याचा मॉक ड्रिल; पोलिसांनी दाखवली तात्काळ कृतीक्षमता
अकोल्यात फटाके फोडून भारतीय सेनेला सलामी
अकोला जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
अकोल्यात मुस्लिम बांधवांकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष; फटाके फोडून मिठाई वाटली
अकोल्यात शिवसेनेकडून सैनिकांना सलाम, लाडू वाटून जल्लोष
“ही कारवाई थांबू नये…” – ऑपरेशन सिंदूरवर शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांची भावुक प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची निर्णायक कारवाई;
(LoC) मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला असून, या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेला कोणतीही संशयास्पद
हालचाल दिसल्यास पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देण्याची मुभा देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत.
डोभाल यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेऊन सुरक्षा आढावा दिला.
त्यानंतर लवकरच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वदलीय बैठक होणार असून,
या बैठकीत प्रमुख राजकीय नेते सहभागी होणार आहेत.
दरम्यान, वाढत्या तणावामुळे देशभरातील 27 प्रमुख विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत.
श्रीनगर, जम्मू, चंदीगड, अमृतसर आणि लुधियाना यांचा समावेश आहे.
विशेषतः उत्तर भारत आणि पश्चिम भारतातील हवाई वाहतूक या निर्णयामुळे ठप्प झाली आहे.
पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार; नागरिक आणि जवानांचा बळी
7 मे रोजी पाकिस्तान सैन्याने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील गावांवर लक्ष करून जोरदार गोळीबार केला.
या हल्ल्यात चार बालकांसह एक सैनिकाचा मृत्यू झाला असून, एकूण 13 जणांचा बळी गेला आहे.
गोळीबारानंतर भारतीय लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या अनेक पोस्ट्स नष्ट केल्या.
गोळीबारामुळे जखमी नागरिकांना रुग्णालयात पोहोचवणेही अवघड झाले.
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील काही सीमावर्ती गावांतील नागरिकांना खबरदारी म्हणून स्थलांतरित करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolian-terrorist-hallyacha-mock-drill-policani-wine/