ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;

ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई; ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोट (प्रतिनिधी) |

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन “प्रहार” मोहिमेअंतर्गत सहायक पोलीस

अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे.

Related News

दि. ५ जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर अंबाडी फाटा येथे नाकाबंदी करून अवैध दारू

वाहतूक करणारा राजेश किसन सदांशिव (रा. राजुरा) याला अटक करण्यात आली.

या कारवाईत त्याच्याकडून:

  • ३०० नग देशी दारूच्या बाटल्या (किंमत ₹ १०,५००/-)

  • वाहतुकीसाठी वापरलेली होंडा शाईन दुचाकी (एमएच-३० बीजी-९०५६) ₹ ४०,०००/-

असा एकूण ₹ ५०,५००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत पोहवा. शेख नासीरपोकॉ. सुमित कुलट यांनी सहभाग घेतला.

ही कारवाई अर्चित चांडक, अभय डोंगरे (अप्पर पोलीस अधीक्षक, अकोला) आणि अनमोल मित्तल

(सहा. पोलीस अधीक्षक/उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Read Also : https://ajinkyabharat.com/akot-yethil-mandal-aadhiwar-pran-pran-matta-halla/

Related News