जान्हवी कपूर सध्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्पटामुळे चर्चेत आहे. जान्हवी चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी वेगवेगळे लूक्स करण्याचा प्रयत्न करतेय. याआधी जान्हवीने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. त्याच्या मागच्या बाजूला क्रिकेटच्या चेंडूंची डिझाईन तयार केलेली आहे
आजच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय, यानिमित्ताने जान्हवीने खास लाल आणि निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.
Related News
राम चरण आणि जान्हवी कपूर स्टारर 'पेड्डी' हा 3 तास 7 मिनिटांचा स्पोर्ट्स-ॲक्शन ड्रामा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच अवघ्या 24 तासांत टॉप ट्रेंडिंगमध्ये नंबर-1 ठरला. बॉक्स ऑफिसवर 333 ...
Continue reading
‘तुझ्या लेकीने असे कपडे घातले तर...’; आशा पारेख यांचा संतप्त सवाल, अभिनेत्रींच्या अंगप्रदर्शनावर 5 मोठे धक्कादायक खुलासे
बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या अंगप्रदर्शनाचा मुद्दा पुन्हा एक...
Continue reading
‘Peddi’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; अवघ्या चार दिवसांत 233 कोटींचा टप्पा पार
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘Peddi’ चित्रपट स...
Continue reading
'Peddi'चा बॉक्स ऑफिसवर धडाका कायम! तिसऱ्या दिवशीही कोट्यवधींची कमाई; 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेशाची तयारी
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'Peddi' बॉक्स ...
Continue reading
112 कोटींचा ऐतिहासिक धमाका! रामचरण-जान्हवीच्या ‘पेड्डी’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रचला विक्रमी इतिहास
साऊथ सुपरस्टार रामचरण आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भ...
Continue reading
‘Peddi’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राम चरणच्या दमदार अभिनयासह ए.आर. रहमानच्या संगीताचीही चर्चा
दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित स्पोर्ट्स ड्रामा ‘Peddi’ अख...
Continue reading
धक्कादायक! 4 लाख रुपये दिवसाचा पगार घेणारा राम चरणचा बॉडीगार्ड केविन कुंटो कोण? चाहत्यावर वाऱ्यासारखी झडप घालणाऱ्या सुरक्षारक्षकाची जोरदार चर्चामुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्ट...
Continue reading
बॉलिवूडमधील तरुण आणि लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी सिनेमांमुळे आणि ग्लॅमरस फॅशन सेन्समुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनयासोबतच फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीतही जान्हवीने...
Continue reading
Janhvi Kapoorचा ब्लू साडीत ग्लॅमरस अंदाज; मनीष मल्होत्राच्या डिझाइनमध्ये ‘दुपट्टा ट्रेंड’ला दिला मॉडर्न ट्विस्ट
बॉलिवूड अभिनेत्री Janhvi Kapoorपुन्हा एकदा तिच्या स...
Continue reading
भोपाल – १६ मे २०२६ रोजी राम चरण अभिनीत आगामी चित्रपट **‘पेड्डी’**चा भव्य झलकप्रदर्शन सोहळा भोपालमध्ये रंगणार आहे. या विशेष कार्यक्रमात केवळ राम चरण आणि जान्हवी कपूरच नव्हे तर दिग्द...
Continue reading
Janhvi कपूरचा भडका: बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरोधात अभिनेत्रीने केली तीव्र पोस्ट
बॉलिवूड अभिनेत्री Janhvi कपूर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तिच्या वयातील अभि...
Continue reading
A R Rahman Controversy ची सुरुवात : एका फोटोने पेटवला वादाचा ठिणगा
A R Rahman Controversy : संगीतविश्वातील महान संगीतकार म्हणून ओळखले जाणारे ए. आर. रेहमान (A R Rahman) हे त्यांच्...
Continue reading
त्यालाच मॅचिंग असं स्लीवलेस ब्लाऊज तिने परिधान केलं होतं. या ब्लाऊजची खासियत अशी की, त्यामागे ६ नंबर लिहिला होता आणि त्याखाली माही असं लिहिलं होतं.
‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी यांच्या आयुष्यावर आधारित असल्याने चाहते या नंबरमुळे पेचात पडले आहेत.
कारण महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर ७ आहे. या नंबरवरून चाहत्यांचा गोंधळ होऊ लागल्याने आता जान्हवीने या नंबरमागचा खुलासा केला आहे.
जान्हवीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले. यावर एका चाहत्याने प्रश्न विचारला की,
“मिस्टर अँड मिसेस माहीच्या प्रमोशन्ससाठी तू जे काही आउटफिट्स घालतेस, त्यावर ६ नंबर का आहे?
त्यामागे दंतकथा काय आहे?” यावर जान्हवीने उत्तर दिलं, ती म्हणाली,
“सगळे जण मला विचारतायत की मी सगळीकडे ६ नंबर असलेले आउटफिट्स घालून का फिरतेय.
महिमाची जर्सी नंबर ६ आहे आणि महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर ७ आहे.
जरी ती महेंद्रसिंग धोनीची मोठी फॅन असली, जसे आपण आहोत; तरी तो नंबर ती वापरू शकत नाही.”
जान्हवी पुढे म्हणाली, “शरण, मी आणि आम्ही सगळे जेव्हा ठरवत होतो की चित्रपटात माझा जर्सी नंबर काय असेल,
तेव्हा आम्हाला जाणवलं की ७ हा जर्सी नंबर फक्त धोनीचाच राहिला पाहिजे. तेव्हा आम्हाला दुसरा नंबर निवडायचा होता.
६ नंबर हा माझा लकी नंबर आहे आणि आशा आहे, हा नंबर माझ्यासाठी भाग्यवानदेखील असेल;
म्हणून महिमाचा जर्सी नंबर ६ आहे आणि धोनी सरांचा जर्सी नंबर ७ आहे आणि तो नेहमीच ७ राहील. मला असं नाही वाटत की कोणीही त्यांच्या या ७ नंबरचा वापर केला पाहिजे.”
दरम्यान, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
तर ३१ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जान्हवी कपूरबरोबर या चित्रपटात राजकुमार राव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.