राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात
महत्त्वाची सुनावणी पार पडली. यानंतर पुढील राष्ट्रवादी
काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाबाबत येत्या ६ नोव्हेंबर रोजी
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
सुनावणी होणार आहे. घड्याळ हे चिन्ह दोन्ही पक्षाला वापरू देऊ
नये, अशी शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
करण्यात आली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत
चर्चा झाली. यासंदर्भातील पुढील सुनावणी आता ६ नोव्हेंबर रोजी
घेण्यात येणार आहे. कोर्टाने अजित पवार गटाला सगळीकडे
घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर लावायला सांगितले होते. ते
डिस्क्लेमर आधी न लावता आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही
ठिकाणावर लावण्यात आले, असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून
करण्यात आला. यावरूनच सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला, ६
नोव्हेंबरपर्यंच प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे निर्देश दिले आहेत. तर
याबाबत अजित पवार गटाला नोटीसही देण्यात आली आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस
घड्याळ चिन्हाचा वापर करू शकते, मात्र निवडणुकीच्या बॅनर्स
आणि पोस्टर्समध्ये हा वादाचा विषय असून न्यायालयात
विचाराधीन असल्याचे लिहावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने
अजित पवार यांना गुरुवारी सांगितले. शरद पवार गटाच्या
याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू होती, त्यात अजित पवार गट
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही, त्यामुळे विधानसभा
निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरण्यापासून थांबवावे, असे म्हटले
होते. तसेच अजित पवार गटाला नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याची
सूचना करावी. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि
उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने अजित पवार गटानेही नवीन
प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देश अजित पवार यांच्या
वकिलांना दिले. आदेशाचे उल्लंघन केल्यास कोर्ट स्वतः
अवमानाचा खटला चालवेल, असा इशाराही दिला. या प्रकरणाची
पुढील सुनावणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.