माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र
निलेश राणे हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
उद्या (23 ऑक्टोबर) संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिंदे गटात प्रवेश करतील. निलेश राणे
यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.
“नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली,
त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार” असल्याचे निलेश
राणे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे हे एकनाथ
शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली
होती. आज निलेश राणे यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. “मी २०१९ ला नारायण राणे
साहेबांसोबत भाजपमध्ये आलो. इथे खूप सन्मान मिळाला. अनेक
नेत्यांनी आदर दिला. प्रेम दिलं. इथे शिस्त पाहायला मिळाली.
देवेंद्र फडणवीसांनी लहान भावाप्रमाणे सांभाळलं. रवींद्र चव्हाण
यांनी ही लहान भावाप्रमाणे वागणूक दिली. सगळ्याच नेत्यांनी
चांगली वागणूक दिली”, असे निलेश राणे म्हणाले.
दरम्यान निलेश राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा
मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. निलेश राणे हे उद्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात
प्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी ४ वाजता निलेश राणेंचा
पक्षप्रवेश होणार आहे.
Read also:https://ajinkyabharat.com/process-of-filing-candidature-starts-from-today/