नाशिक येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरण: जोदुटोणा करणाऱ्या मांत्रिकाला अटक

नेहा पवार

नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार हिने सात पानी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी अंधश्रद्धा हे सुध्दा एक कारण होते.पंचवटी पोलीसांनी त्यादृष्टीने तपास करुन हिरवाडी येथुन एका मांत्रिकाला अटक केली असल्याची माहिती अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे.मयत नेहा पवार हिच्या आत्महत्येमागे कौमार्य चाचणी व जादुटोण्याचे कारण असुन त्याचा पोलीसांनी तपास करावा,असे महाराष्ट्र अंनिस व विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीसांच्या लक्षात आणुन दिले.त्याप्रमाणे पोलीसांनी आरोपी संतोष पवार याच्या घराची झडती घेतांना जादुटोणाचे साहित्य मिळाले.नागाचा आकार असलेल्या खिळ्याला काळा बिबा आरपार केलेला आढळला. त्यासोबत गंडेदोरे व ताविज पण मिळाला.

हे साहित्य कुठून आणले,अशी पोलीसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी भोंदुबाबाचे नाव सांगितले. मयत नेहा पवार ही माहेरवरुन राखेसारखी भस्माची पुडी आणत होती. त्यामुळे घरात अडचणी येतात. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी व नेहाला भिती घालण्यासाठी जादुटोणा केल्याचे आरोपी संतोष पवार व जिजाबाई पवार यांनी सांगितले.त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी नाशिकच्या हिरावाडी येथुन सुनिल बबन मुंजे (वय -४२ वर्ष )या मांत्रिकाला सोमवारी रात्री अटक केली.त्याने त्याच्या राहत्या घरी मंदिर व दरबार करुन लोकांच्या समस्यांवर दैवी व अघोरी इलाज करण्याचे काम करत तो होता.त्याने गुन्ह्यांची कबूली दिली आहे.

पोलीसांनी त्याला सहआरोपी बनविले असुन जादुटोणा विरोधी कायद्याचे कलम लावले आहेत.न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहे.”सदर भोंदुबाबाने आणखी कुणाला फसविले त्याची चौकशी पोलीसांनी करावी.लोकांनी अशा अंधश्रद्धायुक्त प्रकारांपासुन दुर रहावे.कुणाची फसवणुक झाली असल्यास अंनिस किंवा नाशिक पोलीसांशी संपर्क साधावा.

Related News

read also : https://ajinkyabharat.com/adgaon-medical-chowk-turned-into-a-traffic-jam-due-to-encroachment-and-rickshaw-stops/

Related News