गडचिरोली, चंद्रपूरसह आंध्रप्रदेश, छत्तीसगड भागात सध्या नक्षलवाद्यांविरोधात व्यापक मोहिम उघडण्यात आली आहे.
नक्षलवाद्यांची रसद तोडून या राष्ट्रविरोधातील चळवळीचे कंबरेड मोडण्यात येत आहे.
छत्तीसगडमधील घनदाट जंगलात आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान चकमक उडाली.
Related News
यामध्ये 12 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घालण्यात यश आले.
महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून ही कीड हटवण्यासाठी
व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ कडून सुरू
असलेला कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात
आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात धुमश्चक्री सुरू आहे. घनदाट जंगलात
आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान चकमक उडाली. यामध्ये 12 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे.
बिजापूर, सुकमा-तेलंगाणा बॉर्डरवर पण नक्षल्यांना टिपण्यात आले आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशाच्या सीमावर्ती भागत सुद्धा नक्षलवाद्यांची व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षात राष्ट्रविरोधी नक्षलवादी मोहिमेचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
स्थानिक पोलीस आणि खबऱ्यांच्या मार्फत नक्षलवादाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
या चकमकीत मोठे कॅडरचे नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
काल रात्री एक वाजेपासून हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू झाले.
पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चकमक चालली. आताही चकमक सुरू असल्याचे समोर येत आहे.
छत्तीसगड चकमकीत एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाला आहे.
उडीसा राज्यातील स्टेट कमिटीच्या चीफ म्हणून नक्षलवादी संघटनेमध्ये तो पदावर होता.
चलपती हा जवळपास 30 वर्षापासून नक्षल चळवळीत सहभागी होता.
या चकमकीत दोन महिलाही कॅडर नक्षलवादी ठार झाल्या.
एक एसएलआर रायफल, अम्बुंश व ईडी स्फोटके घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात छत्तीसगड पोलीस सीआरपीएफने मोठे
कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी पोलीस पथकाचे
जवान नक्षल ऑपरेशनवर तैनात आहेत. छत्तीसगड पोलीस
अधिकाऱ्यांकडून व सीआरपीएफ कडून केलेल्या आपरेशनावर गृह
मंत्रालयाचे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. केंद्रीय गृह विभागाच्या नक्षल अभियानावर
बारकाईने लक्ष आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती जंगलात भागात
ऑपरेशन सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/he-eats-the-fruits-of-service-like-us-mansecha-eknath-shindenwar-hallabol/