नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७५ वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, जॉर्जिया मेलेनी यांच्यापासून ते व्हॅटिकन सिटीचे प्रमुख पोप लिओ XIV यांच्यापर्यंत अनेक जागतिक नेत्यांनी मोदींना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
पोप लिओ XIV यांचा विशेष आशीर्वाद
व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर्स स्क्वेअर येथे बुधवारी झालेल्या पोपल ऑडियन्सला ३० हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. याच समारंभात भारतीय अल्पसंख्याक संघटनेच्या शिष्टमंडळाची पोप लिओ XIV यांनी भेट घेतली. राज्यसभेचे खासदार सतनाम सिंग संधू, खासदार व माजी राजनयिक हर्षवर्धन श्रृंगला आणि आयएमएफ समन्वयक हिमानी सूद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत पोप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला आशीर्वाद दिला.
यावेळी सतनाम सिंग संधू यांनी पंतप्रधान मोदी आणि शीख समाजातील नातेसंबंधांवर आधारित ‘हार्ट टू हार्ट : रेव्हरन्स ऑफ अ सागा’ हे पुस्तक पोप यांना भेट दिले.
ट्रम्प- पुतिन यांची शुभेच्छा
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना फोन करून शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर त्यांनी लिहिले, “माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर खूप छान संभाषण झाले. ते उत्तम काम करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.”
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पत्राद्वारे शुभेच्छा देत म्हटले की, “प्रिय पंतप्रधान, आमच्या दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यात आणि परस्पर सहकार्य वाढविण्यात तुमचे योगदान महत्त्वाचे आहे.”
देशभरातूनही शुभेच्छांचा वर्षाव
मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, सेवा कार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक राज्यांतील नेते, कलाकार आणि नागरिकांनीही सोशल मीडियाद्वारे पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या.
read also :https://ajinkyabharat.com/kumar-sanunchan-khasi-ayushyawar-moth-state/
