मुंबई :बॉलिवूडचे दिग्गज गायक कुमार सानू हे त्यांच्या सुरेल गाण्यांमुळे लाखोंच्या हृदयावर राज्य करतात. मात्र, त्यांचं खासगी आयुष्य कायमच वाद आणि चर्चेचं केंद्र राहिलं आहे. पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट, दोन प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अफेअरच्या अफवा आणि दुसरं लग्न या सगळ्यामुळे गायकावर अनेकदा टीका झाली. आता स्वतः कुमार सानू यांनीच आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठं वक्तव्य करत मौन तोडलं आहे.
घटस्फोट आणि पहिलं लग्न
कुमार सानू यांनी पहिलं लग्न रीटा भट्टाचार्य यांच्यासोबत केलं होतं. दोघांना तीन मुलं झाली. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकले नाही आणि १९९४ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर सानू यांच्यावर पत्नीची फसवणूक केल्याचे आरोप झाले.
अभिनेत्रींसोबत अफेअरच्या चर्चा
घटस्फोटानंतर गायकाचं नाव अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांच्यासोबत जोरदार जोडलं गेलं. त्यांचं नातं मोडलं कारण अफेअर होतं, अशा चर्चांनाही उधाण आलं. मात्र, सानू यांनी या सर्व अफवा फेटाळून लावत, “मिनाक्षी आणि माझी कधी ओळखच झाली नाही,” असं स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘बिग बॉस १९’ स्पर्धक अभिनेत्री कुनिका सदानंद हिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना सानू यांनी फसवलं असल्याचा आरोप केल्याने पुन्हा एकदा गायक चर्चेत आले आहेत.
“मी स्त्रीलंपट आहे… हे वाक्य अनेकदा ऐकलं”
एका मुलाखतीत बोलताना कुमार सानू म्हणाले,
“मी स्त्रीलंपट आहे हे वाक्य अनेकदा ऐकलं. जर खरंच तसं असतं तर, माझ्या दुसऱ्या लग्नानंतरही अशा अफवा उठल्या असत्या. पण तसं झालं नाही.”
दुसरं लग्न आणि कुटुंब
पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कुमार सानू यांनी सलोनी भट्टाचार्य यांच्यासोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला २३ वर्षे पूर्ण झाली असून, त्यांना दोन मुली आहेत.
read also :https://ajinkyabharat.com/royal-crisis/
