राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती

तेल्हारा दि :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोला जिल्हा महासचिव पदी तेल्हारा येथील युवकांचे प्रेरणास्थान कुशल

संघटक विकास पवार यांची नियुक्ती करण्यात आली मुंबई येथील कार्यक्रमांमध्ये अजित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

Related News

अकोला जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले असून विकास पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी

काही दिवसापूर्वीच अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात व आमदार अमोल दादा मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.

त्यानंतर मुंबई येथील आयोजित कार्यक्रमांमध्ये विकास पवार यांच्या कामाची दखल घेऊन त्यांनची

अकोला जिल्हा महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे या वेळी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य चे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार अमोल दादा मिटकरी, जिल्हा अध्यक्ष मोहम्मद बदरू जमा,

संध्याताई वाघोडे, प्रतिभाताई अवचार, काशीराम साबळे, अमोल काळोने, किशोर तेलगोटे, हरिदास वाघोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/gurupaularna-knowledge-gratitude-aani-sadhgunanka-holy-festival/

Related News