राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर
करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
घोषणा केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा
करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार
गटाच्या 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती. तर
दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.
त्यानंतर आता तिसऱ्या यादीत ९ जणांची उमेदवारी घोषित करण्यात
आली आहे. या उमेदवारांमध्ये बीडमधील परळी मतदारसंघात
धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात
आला आहे. तर मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर
हिचे पती फहद अहमद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार
- वाशिम कारंजा – ज्ञायक पाटणी
- चिंचवड – राहुल कलाटे
- माजलगाव – मोहन जगताप
- परळी – राजेसाहेब देशमुख
- हिंगणा – रमेश बंग
- अणुशक्तीनगर – फहद अहमद
- मोहोळ – सिद्धी कदम
- भोसरी – अजित गव्हाणे
- हिंगणघाट – अतुल वांदिले
Read also: https://ajinkyabharat.com/nationalist-congress-ajit-pawar-gatachi-third-list-released/