नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन; महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात, अनिकेत शास्त्री नजरकैदेत

नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन; महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात, अनिकेत शास्त्री नजरकैदेत

काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात

हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साधू महंतांची धरपकड केली आहे.

Nashik News : पुणे रोडवरील काठे गल्ली   परिसरातील अनधिकृत धार्मिक

स्थळ 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनानी आज शनिवारी

(दि. 22) आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज सकाळपासून महापालिका प्रशासनाने अनधिकृत

Related News

धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली आहे. तर  जोपर्यंत अनधिकृत बांधकाम हटविले जात नाही तोपर्यंत

आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी साधू महंतांची धरपकड सुरू केली आहे. महंत सुधीरदास पुजारी

यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर महंत अनिकेत शास्त्री  यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

काठे गल्ली सिग्नलकडून नागजी चौक, मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे.

या धार्मिक स्थळावर कारवाई सुरु असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठी कुमक तैनात केली आहे.

मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठे गल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केल्याचे

आदेश पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी जारी केले आहेत.

द्वारका ते काठे गल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहे.

महंत सुधीरदास पुजारी पोलिसांच्या ताब्यात 

या धार्मिक स्थळावर कारवाई सुरू असताना या भागात महंत सुधीरदास पुजारी दाखल झाले.

यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांच्यासह 10 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तर सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांची धरपकड सुरू आहे.

महंत अनिकेत शास्त्री यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

अनिकेत शास्त्री यांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महंत अनिकेत शास्त्री महाराज यांना घराबाहेर पडण्याची मनाई पोलिसांनी केली आहे.

तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे काठे गल्ली चौकात दाखल झाल्या आहेत.

MORE NEWS HERE

https://ajinkyabharat.com/manikrao-kokate-dhananjay-mundencha-rajinama-attha-anna-hazan-maganiver-maganiwar-chandrashekhar-bawanku-clearly-bolle-mhanale/

Related News