नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ

नरेंद्र मोदी

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत एनडीएच्या खासदारांनी नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड केली आहे.

Related News

यामुळे नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळाला आहे.

तर, नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा 9 जून रोजी पार पडणार आहे.

9 तारखेला सायंकाळी मोदींचा शपथविधी सोहोळा पार पडणार आहे.

भाजपचे जेष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे.

या शपथ विधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो, ड्रोन आणि ‘स्नायपर्स’ तैनात करण्यात आले आहेत.

याशिवाय, परदेशी पाहुणे राजधानीतील लीला, आयटीसी मौर्य, ताज, ओबेरॉय आणि क्लेरिजेस हॉटेल्समध्ये थांबणार आहेत.

यामुळे हे हॉटेल्स देखील सुरक्षेच्या कक्षेत घेण्यात आले आहेत.

Read Also https://ajinkyabharat.com/prime-minister-modis-resignation-recommendation-to-dissolve-lok-sabha-approved-by-president/

Related News