नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

नागपूर

नागपूरमधील लता मंगेशकर रुग्णालयात मध्य भारतातील पहिलीच यशस्वी लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

राजस्थानमधील ४० वर्षीय रुग्णाने कॅन्सरमुळे ८ वर्षांपूर्वी लिंग गमावले होते.

Related News

अखेर साडेनऊ तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या चमूने रुग्णाच्या हाताच्या मांसपेशींपासून नवीन लिंग तयार करून यशस्वी प्रत्यारोपण केले.

या अद्वितीय शस्त्रक्रियेसाठी डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल,

डॉ. अभिराम मुंडले आदी प्लास्टिक सर्जन्सनी विशेष मेहनत घेतली.

सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडून लिंगात रक्तप्रवाह आणि संवेदना सुरळीत होईल, याची दक्षता घेतली गेली.

रुग्ण सध्या पूर्णपणे बरा असून त्याला नवे आयुष्य मिळाले आहे.

ही शस्त्रक्रिया ‘मायक्रोव्हॅस्क्युलर’ पद्धतीने करण्यात आली असून नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/jastagavatiyal-shetkyancha-telhara-tehsil-morcha/

Related News