हल्लीच म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या भूकंपामुळे अनेक
नागरिकांची हानी झाल्याचे देखील दिसून येत आहे. या बद्दल सविस्तर जाणून घ्या.
Related News
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत
तुमचे वैयक्तिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे?
सासरी आलेल्या महिलेचं घर जाळून टाकल्याची घटना विचित्र प्रकारे घडली आहे,
सावरा येथे भीषण आग; दोन जनावरांचा मृत्यू, घराची राख
शुक्रवारी म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले,
ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी १२:५० वाजता ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला,
त्यानंतर केवळ १२ मिनिटांत दुसरा ६.४ तीव्रतेचा धक्का लागला.
म्यानमारमध्ये भूकंपाच्या धक्क्यांची सतत पुनरावृत्ती होत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
मृतांचा आकडा १००० च्या आसपास पोहोचला आहे, तर शेजारील थायलंडमध्येही या भूकंपाचा परिणाम झाला
असून एक इमारत कोसळून किमान ९ जणांचा मृत्यू झाला.
परंतु, प्रश्न उभा राहतो – म्यानमारमध्ये सतत भूकंपाचे धक्के का जाणवतात? चला, याची संपूर्ण माहीती जाणून घेऊया.
भूकंपाचे मुख्य कारण पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचाली आहेत.
जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर सरकतात, तेव्हा त्यातून घर्षण निर्माण होऊन भूकंप होतो.
फॉल्ट लाईनच्या बाजूने या अचानक हालचालीमुळे धोकादायक जमिनीचा थरकाप होतो,
आणि कधी कधी भूस्खलन, पूर, तसेच त्सुनामी देखील होऊ शकते.
म्यानमारमधील भूकंप ‘स्ट्राइक स्लिप फॉल्टिंग’मुळे झाला आहे, असे USGS ने म्हटले आहे.
याचा अर्थ दोन प्लेट्स एकमेकांवर घासल्या गेल्या आहेत. भूकंपाचे सर्वात तीव्र हादरे सहसा
भूकंपाच्या केंद्राजवळ, म्हणजेच एपिसेंटरमध्ये जाणवतात.
परंतु, या धक्क्यांचा प्रभाव शेकडो किंवा हजारो मैल दूरही जाणवू शकतो.
भूकंप कसा मोजला जातो?
भूकंपाच्या तीव्रतेचा माप त्याच्या आकार, तीव्रता आणि परिणामावर आधारित असतो.
यासाठी सिस्मोग्राफचा वापर करून ऊर्जा मोजली जाते.
१९३० च्या दशकात चार्ल्स रिश्टरने तयार केलेले रिश्टर स्केल भूकंप मोजण्यासाठी वापरले जात होते,
परंतु आता मोमेंट मॅग्निट्यूड स्केलचा वापर अधिक अचूक मानला जातो.
यामध्ये भूकंपाची तीव्रता मोजली जाते, आणि ती प्रभावित क्षेत्रानुसार बदलते.