मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

बीड जिल्ह्यातील गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र

सरकारने मोठी पावले उचलली आहेत. न्यायालयीन लढ्यासाठी राज्य सरकारने

ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

Related News

तसेच अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांना सहाय्यक विशेष

सरकारी वकील म्हणून नेमण्यात आले आहे.

सरकारची ठाम भूमिका

या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे दिसून येत आहे.

देशमुख यांच्या हत्येमागील कट उघड करण्यासाठी आणि आरोपींना कठोर

शिक्षा मिळावी, यासाठी सरकारने नामांकित वकीलांची नियुक्ती केली आहे.

काय आहे प्रकरण?

बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी मोठी राजकीय उलथापालथ झाली असून,

अनेक लोक आरोपींकडे निर्देश करत आहेत.

कुटुंबीय व गावकऱ्यांनी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन उभारले होते.

सरकारच्या या निर्णयामुळे देशमुख हत्या प्रकरणात कठोर कारवाई

होण्याची शक्यता असून, न्याय मिळण्याचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/indrajit-sawant-threat-case-prashant-koradkarchaya-responent-kolhapur-polisancha-pathak-nagpurla/

Related News