दोन दिवसीय ब्लॉकमध्ये ५९ लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार
असून ४७ मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे.
काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकात थांबवण्यात येणार
असून त्याच स्थानकातून परतीचा प्रवास सुरू करतील
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १२ आणि १३ची लांबी २४ डब्यांच्या गाड्या
चालवण्यासाठी वाढवण्यात येत आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने मध्य रेल्वेने
दोन दिवस मध्यरात्रीच्या वेळी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. शुक्रवार / शनिवारी मध्यरात्री पाच तासांचा,
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
तसेच शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकल रद्द राहणार आहेत.
दोन दिवसीय ब्लॉकमध्ये ५९ लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार असून ४७ मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे.
काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकात थांबवण्यात येणार असून त्याच स्थानकातून परतीचा प्रवास सुरू करतील.
मेल-एक्स्प्रेसच्या सविस्तर थांब्यांसाठी मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
पहिला ब्लॉक (पाच तास)
स्थानक – सीएसएमटी ते भायखळा
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – शुक्रवारी रात्री ११.३० ते शनिवारी पहाटे ४.३०
दुसरा ब्लॉक (१० तास)
स्थानक – सीएसएमटी ते भायखळा / वडाळा रोड
मार्ग – अप-डाउन जलद आणि धीमा, अप आणि डाउन हार्बर
वेळ – शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ९.१५
शनिवारी या एक्स्प्रेस राहणार रद्द
पुणे-सीएसएमटी डेक्कन
पुणे-सीएसएमटी इंटरसिटी
नांदेड-सीएसएमटी तपोवन
रविवारी या एक्स्प्रेस राहणार रद्द
सीएसएमटी-पुणे डेक्कन
सीएसएमटी-पुणे इंटरसिटी
सीएसएमटी-नांदेड तपोवन
सीएसएमटी फलाट क्रमांक १२/१३ विस्तारीकरणाच्या ब्लॉकमुळे रविवारी
दिवसा मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
MORE UPDATES HERE