मुर्तिजापूरचे अक्षय लव्हाळे Indian Talent Olympiad Excellence Awardने सन्मानित

मुर्तिजापूर

मुर्तिजापूर, दि. ४ नोव्हेंबर – वाशी, नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात Indian Talent Olympiad (ITO) तर्फे देशभरातील निवडक नवोन्मेषी शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुर्तिजापूर येथील रहिवासी गजानन लव्हाळे यांचा पुतण्या व रघुनाथ लव्हाळे यांचे चिरंजीव अक्षय रघुनाथ लव्हाळे यांना “Excellence Award” ने सन्मानित करण्यात आले.

देशातील लाखो युवक-युवतींचे प्रेरणास्थान आणि देशाच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आ. किरण बेदी यांच्या हस्ते  लव्हाळे सरांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पी. एम. श्री  जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगांव राजा येथील शिक्षक असलेले  अक्षय लव्हाळे हे जिल्हा परिषद शाळेतील एकमेव शिक्षक आहेत, ज्यांना या राष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आले. किरण बेदी यांनी त्यांना “शाबासकीची थाप” देत विशेष अभिनंदन केले.

देशभरातील नामांकित SB, CBSE आणि ICSE शाळांतील मुख्याध्यापक व कोऑर्डिनेटर्स मधून हा मान मिळवणारे लव्हाळे  यांचा हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. विद्यालयात स्पर्धा परीक्षांचे वातावरण निर्माण करून NMMS आणि National Olympiad सारख्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे  लव्हाळे सर यांनी सांगितले.

Related News

त्यांच्या या यशामुळे पी. एम श्री जि. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगांव राजा या विद्यालयाचे तसेच मुर्तीजापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/three-students-of-murtijapur-public-school-selected-for-departmental-karate-competition/

Related News