प्यार से हो गये प्यारे प्यारे नयन…
कवयित्री भुवन मोहिनी यांनी श्रोत्यांना केले मोहित
Related News
काव्य कलश कवी संमेलनाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी
मुर्तीजापुर : आसू आसुओ से रहे खारेखारे नयन… प्यार से हो गये
प्यारे प्यारे नयन… अब मिले है मिलन तो मजा ले रहे है हमारे
तुम्हारे दो नयन या काव्यपंक्ती सादर करताच टाळ्यांच्या
कडकडाटात मुर्तीजापुरकरांनी कवयित्री भुवन मोहिनी यांचे स्वागत
केले. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुगत वाघमारे यांनी मूर्तिजापूर
येथील लाल शाळा मैदानात आयोजित केलेल्या काव्य कलश कवी
संमेलनात युग कवी कुमार विश्वास यांच्यासह नामवंत कवींनी
एकाहून एक सरस कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
कवी रामबाबू यांनी सद्यस्थितीत असलेल्या राजकीय
परिस्थितीविषयी मुक्तक सादर करीत उपस्थितांना अंतर्मुख केले.
तर कवी चंदन राय यांनी प्रेम रसातील कविता सर्वांसमोर सादर
केल्या. कवयित्री भुवन मोहिनी यांनी सुद्धा हास्य आणि प्रेम
रसातील कविता सादर करीत सर्वांची मने प्रफुल्लित केली.
कवी रमेश मुस्कान यांनी हास्य रसातील मुक्तक सादर करत
सर्वांना खळखळून हसविले. तर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
डॉ.कुमार विश्वास यांनी राजकीय परिस्थितीवरील व्यंग, प्रेम रस,
अध्यात्म, अशा विविध विषयांवरील कविता सादर करीत
जनजागृतीचा प्रयत्न केला. डॉ. कुमार विश्वास यांचे स्वागत
मारवाडी समाज संमेलन,महामंत्री, एडवोकेट अविन अग्रवाल यांनी
केले. त्याचप्रमाणे श्रीकांत तिडके आणि परिवार, काजल राजवैद्य,
सुनील सरदार आणि सहकारी, बाबा रिजवान आणि सहकारी यांनी
केले. उपस्थित कवयित्री भुवन मोहिनी, कवी चंदन राय, कवी राम
बाबू आणि कवी रमेश मुस्कान यांचे स्वागत डॉ. सुगत वाघमारे,
तनुजा वाघमारे आणि तिक्ष्णगत वाघमारे यांनी केले. याप्रसंगी
युगकवी कुमार विश्वास यांना संत गाडगेबाबा यांची मूर्ती डॉक्टर
सुगत वाघमारे यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित स्थानिक मराठी कवींना सुद्धा डॉ.
कुमार विश्वास यांच्या समोर कविता सादर करण्याची संधी
मिळाली. या संधीचे सोनं करत एकापेक्षा एक सुंदर कविता मराठी
कवींनी सादर केल्या. तसेच डॉ. कुमार विश्वास यांचे स्वागतही
मराठी कवींनी केले. हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.
सुगत वाघमारे यांचे आभार मानले. कवितांच्या माध्यमातून
राजकीय व्यंग, हास्य तसेच महापुरुषांच्या विचारांना उजाळा या
कवी संमेलनाच्या निमित्ताने मिळाला. कार्यक्रमाचे आयोजक डॉ.
सुगत वाघमारे हे उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता तसेच एक उत्कृष्ट
शायर आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा वावर सर्वांना परिचित
आहे. अकोला जिल्ह्यामध्ये विविध साहित्य संमेलनाचे, गझल
साहित्य संमेलनाचे आयोजन, क्रीडा स्पर्धांचे आयोजन अशा
विविध आघाडींवर ते कार्य करतात. काव्य कलश या कार्यक्रमाचे
आयोजन यापूर्वी अकोला गौरक्षण संस्थान या ठिकाणी करण्यात
आले होते. त्यावेळी सुगत वाघमारे यांच्या शायरीच्या पुस्तकाचे
विमोचन करण्यासाठी डॉ. कुमार विश्वास हे अकोला या ठिकाणी
आले होते. परंतु मुर्तीजापुर तालुक्यामध्ये साहित्याची उत्कृष्ट
चळवळ उभी व्हावी. इथल्या स्थानिक कलावंतांना व्यासपीठ
उपलब्ध व्हावे आणि साहित्य मेजवानी त्यांना मिळावी या उद्देशाने
डॉ. सुगत वाघमारे यांनी काव्य कलश या कार्यक्रमाचे आयोजन
मुर्तिजापुर या ठिकाणी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया भारती
आणि ॲड. सचिन वानखेडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जया
भारती-इंगोले यांनी केले.
मराठी काव्य कलश:
मराठी काव्य कलश मधे अनेक कवि सहभागी झाले होते. यामधे
किशोर बळी, गोपाल मापारी, निलेश कवडे, अमोल शिरसाठ,
रवींद्र जवांदे – मूर्तिजापूर, संदीप वाकोडे – मूर्तिजापूर, मिलिंद
हिवराळे – बार्शीटाकळी, अमोल गोडचवर सहभागी झाले होते.
डॉक्टर नागपुरे यांचा सत्कार:
डॉ. प्रवीण नागपुरे यांना कॅन्सर झाला होता मात्र युग कवी कुमार
विश्वास मुर्तीजापुर मध्ये येत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यामुळे विश्रांती न घेता ते लाल शाळा मैदानात पोहोचले. या
काव्य रसिकाचा सत्कार डॉ. कुमार विश्वास यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/major-accident-at-factory-in-pune-city-four-workers-died/