मुर्तीजापुर ते पातुर नंदापूर बस सेवा चालू करा अन्यथा उपोषण.

मुर्तीजापुर ते पातुर नंदापूर बस सेवा चालू करा अन्यथा उपोषण.

पातुर नंदापूर : ते मूर्तीजापुर 22 किलोमीटर अंतर असून गावकऱ्यांना हेच बाजारपेठ जवळ असल्याकारणाने सोयीचे आहे.

व्यापारी, विद्यार्थी, शेतीचे साहित्य आणण्यासाठी जवळ असलेले ठिकाण म्हणजे मूर्तिजापूर

त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली एसटी बस कायमस्वरूपी चालू असताना अचानक पणे रात्रीचा7 वाजता निघणारा टाईम बंद करण्यात आला.

त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. व्यापारी दिवसभर आपला म** विकून, शाळेच्या

विद्यार्थ्यांना आपले ट्युशन क्लास करून पातुर नंदापुर ला येण्यासाठी रात्रीची एसटी बस सुरळीत होती.

अचानकपणे बंद केल्यामुळे गावचे सरपंच सचिन लाखे यांनी मुर्तीजापुर एसटी आगाराला 15 ऑगस्टपर्यंत बस सेवा चालू करण्यात

यावी अन्यथा 15 ऑगस्ट रोजी एसटी आगार मुर्तीजापुर विद्यार्थी,व्यापारी व सरपंच उपोषणाला बसणार असे निवेदन दि.28 जुलै रोजी देण्यात आले.

निवेदन देतेवेळी पातुर नंदापूर ते सरपंच सचिन लाखे, सुनील बनसोड, उमेश भुजाडे, बालू देवगिरकर, ताले वार खा शेर खा, वानरे काका, हे उपस्थित होते.