मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तिकीट तपासकाची आत्महत्या – घरगुती तणाव कारणीभूत?

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तिकीट तपासकाची आत्महत्या – घरगुती तणाव कारणीभूत?

मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. रेल्वे तिकीट तपासक

(T.C) सुमेध मेश्राम (वय 40) यांनी मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

घटनेमुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली आहे.

Related News

घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर ते भुसावळ जाणाऱ्या मालगाडीखाली उडी

घेत सुमेध मेश्राम यांनी जीवन संपवले. हे दुर्दैवी कृत्य फलाट क्रमांक 1 समोर घडले.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही

सुमेध मेश्राम हे आपल्या कर्तव्यावर असताना आत्महत्या केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, घरगुती तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही.

पोलिस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

अधिक तपास करून आत्महत्येच्या मागील सत्य उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

🔴 घटनेबाबत अधिक माहिती मिळताच अपडेट दिला जाईल.

Related News