मुंडगाव येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटचा दुजा भाव

मुंडगाव येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटचा दुजा भाव

सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटच्या अधिकारी यांनी लोकांचे पक्के घरे पाडली परंतु

मोबाईल टॉवर का पाडण्यात आले नाही? .. सामान्य जनतेचा प्रश्न.

 

Related News

अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील रस्त्यावरील

अतिक्रमण काढण्यासाठी गेल्यावर काही दिवसांपूर्वी सर्व रहिवाशांना नोटीस बजावण्यात

आल्या होत्या परंतु मोबाईल टाॅवर सुद्धा रस्त्यात असल्यावरही मोबाईल टाॅवर काढण्यासाठी

सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोटच्या उपविभागीय अधिकारी यांनी नोटीस बजावली नसल्याचे समजते.

रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचे नोटीस मध्ये उल्लेख केला

परंतु संबंधित अकोट बांधकाम उपविभाग अकोटच्या उपविभागीय अधिकारी यांनी यावेळी पक्के घरे पाडली

परंतु रस्त्यावर असलेल्या मोबाईल टाॅवर सुद्धा काढण्यात यावा अशी मागणी सुद्धा येथील नागरिकांनी केली आहे

.जेव्हा मोबाईल टाॅवर चे अतिक्रमण काढल्या नाही तर आम्हा गरीबांच्या झोपड्या कशाला पाडता अशी मागणी सुद्धा येथील नागरिकांनी केली आहे.

तसेच अतिक्रमण काढायचे असेल तर पुर्णपणे पणे काढा दुजा भाव कशाला करता सर्व प्रथम मुंडगाव येथील

मोबाईल टाॅवर रस्त्यावरुन हटवा त्या नंतरच घरे पाडा असे सुद्धा येथील नागरिक बोलत आहेत.

तसेच अतिक्रमण काढायचे बाबतीत येथील काही नागरिकांनी संबंधित ठेकेदार व उपविभागीय

अधिकारी यांना आदेश मागीतला परंतु संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा आदेश दाखविला नाही व

अतिक्रमण बंद करुन काढता पाय घेतला तेव्हा अकोट सार्वजनिक बांधकाम उपविभाग चे उपविभागीय

अधिकारी हे मोबाईल टाॅवर चे अतिक्रमण काढतात किंवा नाही या कडे येथील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.

व आता संबंधित अधिकारी केव्हा अतिक्रमण काढतात या कडे संपुर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Read more here : https://ajinkyabharat.com/vhalantine-de-chaya-divashi-kangana-ranautchaya-hotlcha-fantastic-opening-wage-thi-kitila/

Related News