मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!

मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!

अकोट शहर प्रतिनिधी… राजकुमार वानखडे ..

अकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले संत नगरी मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे या नावाने प्रसिद्ध असलेला

आठवडी बाजार मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून येथील असलेले मार्केट पडण्याच्या मार्गावर आहे.

Related News

व मार्केट मधील सागवान सुद्धा चोरीला जाण्याची शक्यता आहे. तेव्हा या मार्केटची दुरुस्ती व बाजाराची दुरुस्ती १०दिवसात न केल्यास

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्या बाबत येथील समाज सेवक प्रभाकर गवई यांनी

लेखी निवेदन ग्रामपंचायत चे सचिव जाधव यांना दिले आहे. सदर आठवडी बाजार हा अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे.

सदर आठवडी बाजाराला अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात आले असताना या ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांच्या

नावाच साधं बॅनर सुद्धा ग्रामपंचायत चे वतीने लावण्यात आले नाही.तसेच अकोला जिल्ह्यातील व अकोट तालुक्यातील

लोकसंख्येच्या नुसार सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाते .सदर गावातील लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.

त्यामुळे स्थानिक गावातील आठवडी बाजार हा प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी खुली जागा आहे त्या ठिकाणी ओटे बांधकाम करावे ,

आठवडी बाजारामध्ये अनेक व्यापारी आपला माल विक्रीला आणतात परंतु बाजार हा व्यवस्थित नसल्याने नाईलाजाने व्यापाऱ्यांना रस्त्यावर बसावे लागते.

आवश्यक अशा सुविधा नाहीत.सदर बाजारात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. व बऱ्याच ठिकाणी दुर्गंधी सुद्धा येत आहे.

हा बाजार आठवड्यातून एक दिवस भरणारा बाजार नागरिकांच्या सेवे करीता सुसज्ज ठेवणे ग्रामपंचायत मुंडगाव यांचे कर्तव्य आहे.

बाजार हर्राशी २ ते ३ लाख रुपयांची होते परंतु बाजाराची परिस्थिती पाहता अतिशय घाणीची आहे.

आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने या बाजारा कडे प्रभारी सरपंच व सचिव यांनी तातडीने लक्ष देऊन

अण्णाभाऊ साठे आठवडी बाजाराची जी दुरावस्था झाली आहे ती १० दिवसात पूर्ण करावी.

न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार

अशा आशयाचे प्रभाकर गवई यांनी निवेदन ग्रामपंचायत चे सचिव जाधव यांना सादर केले आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akolidya-road-safety-wihijan-mohimachaya-vyagatun-vahatuk-janjagrutila-jor/

Related News