अकोला – अकोला जिल्ह्यातील मुंडगाव येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक द्वारका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
ग्रामीण भागात पोळा हा शेतकऱ्यांचा आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणून मानला जातो.
या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पारंपरिक वेशभूषेत सजवून गावातून मिरवणूक काढली. आकर्षक परिधान केलेले
बैल, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि मंगल वातावरणामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही जुनी परंपरा आजही गावात टिकून असून, द्वारका उत्सवाला सामाजिक ऐक्य आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. गावकऱ्यांच्या
मोठ्या सहभागामुळे या उत्सवाला यंदाही भव्य स्वरूप लाभले.
Read also :https://ajinkyabharat.com/umra-yehetha-traditional-dwarka-festival-enthusiast/