मुंबई : राष्ट्रीय राजधानी दिल्लीला दीर्घकाळ प्रदूषणाची राजधानी राहिली आहे. दिल्लीतील अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 पेक्षा जास्त आहे. दिल्लीशिवाय मुंबई, कोलकाता यासह देशात अनेक महानगरे आहेत. मात्र दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. मग या मागचे कारण काय? मुंबई आणि कोलकाता (मुंबई-कोलकाता प्रदूषण) सारख्या शहरांमध्ये परिस्थिती तितकीशी वाईट नाही, तर दिल्ली अनेक वर्षांपासून प्रदूषणाशी का झगडत आहे.
मुंबईसह इतर शहरात अगदी दिल्ली, कोलकातापर्यंत फटाके मोठ्या प्रमाणात वाजवले गेले. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती दखल घ्यावी लागणार आहे.अशातच वाढत्या प्रदूषणामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरातील काही भागात हवा वाईट असल्याची नोंद झाली आहे. मात्र, गुरुवारी मुंबईतील नेव्ही नगर कुलाबा येथे ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली, तर इतर भागात ‘मध्यम’ हवा नोंदली गेली. नेव्ही नगर कुलाबा येथील हवा निर्देशांक 306 इतका होता.
मुंबईचे तापमान आज, ८ नोव्हेंबर २०२४ रोजी २८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर दिवसभराच्या अंदाजानुसार किमान २३ अंश सेल्सिअस आणि कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी ११ किमी आणि सापेक्ष आर्द्रता ५०% असणार आहे. सकाळी 06 वाजून 42 मिनिटांनी सूर्योदय झाला असून संध्याकाळी 06 वाजून 2 मिनिटांनी सुर्यास्त होईल.
मुंबई एक्यूआय
मुंबईतील एक्यूआय आज १९४.० इतका मोजण्यात आला असून शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम असल्याचे दिसून येते. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर-इंडिया) नुसार, पीएम 10 चा एक्यूआय शून्य ते 50 ‘चांगला’, 50 ते 100 ‘समाधानकारक’, 100 ते 200 ‘मध्यम’, 200 ते 300 ‘खराब’, 300 ते 400 ‘अत्यंत खराब’ आणि 400 ते 500 ‘गंभीर’ मानला जातो.