बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत उमंग पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
तुम्ही आतापर्यंत सर्वसामान्य ते निवृत्त अधिकाऱ्यांना निवडणूक लढवल्याचे ऐकले
असेल पण मुंबई पोलिसांनीही निवडणूक लढवल्याचे तुम्ही ऐकले आहे का?
Related News
जय श्रीराम जय गोमाता .🚩🚩
काल दिनांक 05/07/2025 रोजी
गोपनीय माहितीनुसार सांगळूद येथून बार्शीटाकळी
ला 4 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात
असताना गौरक्षक दलाच्या गौरक्षक...
Continue reading
देऊन तिरोडा-आकोट या चालत्या एसटी बसमधून वाहकाने खाली उतरून दिले
अकोट
अशी गंभीर घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली तिरोडा आगाराची बस अकोटला साडेसात आठ वाजेच्या दरम्यान पोहोचते व ...
Continue reading
अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील इंटरनॅशनल
स्कूल ऑफ एंटीग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये
आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांची
दिंडी काढण्यात आली.
यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्याने
...
Continue reading
अकोला – अकोला शहरातील ३२० वर्षे जुने श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मंगलमय वातावरणात महापूजा संपन्न झाली. मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्वस...
Continue reading
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष
गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेविरोधात एसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने
...
Continue reading
पातूर : तालुक्यातील ग्रामपंचायत बोडखा (चिंचखेड) मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करून
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.राज बोरकर यांनी केला आह...
Continue reading
अकोला शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
नीट परीक्षेच्या तयारीसाठी अकोल्यात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
विश...
Continue reading
अकोट शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
केवळ “मुलाकडे आई अधिक लक्ष देते” या कारणावरून एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्दय खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समो...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
मुंबई पोलीसही निवडणूक लढतात. पण, स्वतःच्या पगारदार पतसंस्थेसाठी.
गेल्या 100 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्थेच्या निवडणुकीत मुंबई पोलिसांचे विविध पॅनेल उभे होते.
त्यात दादा सलगर यांच्या पॅनलने बाजी मारली. उमंग पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
या पतसंस्थेतील 28,060 सभासद निवडणुकीकरता पात्र होते.
त्यापैकी 10,949 मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
मुंबई पोलिसांच्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित,
मुंबई या पतसंस्थेची 3 ऑगस्ट 1920 रोजी स्थापना करण्यात आली होती. मुंबईचे विद्यमान पोलीस
आयुक्त या पतसंस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र सदर पतसंस्थेतील इतर 13
सदस्यांच्या पदासाठी दर ५ वर्षांनी निवडणूक घेतली जाते. मात्र, कोरोना काळात निवडणूक घेणे शक्य
नसल्याने तत्कालीन उमंग पॅनलला पुढे मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत संपल्याने पुन्हा निवडणूक पार पडली.
पाच पॅनल निवडणुकीसाठी होते रिंगणात
या पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण 32,000 सदस्यांपैकी 28,060 सदस्य मतदानास पात्र होते.
प्रत्येकी 13 उमेदवार असलेले 5 पॅनल एकमेकांविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले होते. उमंग, संजीवनी,
परिवर्तन, दक्षता आणि समर्थ असे पाच पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. मुंबईतील सर्व 99 पोलीस ठाणे,
विशेष शाखा कार्यालये, पोलीस आयुक्त कार्यालयातील विविध विभाग, पोलीस महासंचालक कार्यालय
तसेच इतर कार्यालये पात्र उमेदवारांनी पिंजून काढली होती. 10,949 मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला.
त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
उमंग पॅनलने रचला इतिहास
या निवडणुकीत एकूण 73 उमेदवार निवडणूक लढवत होते. त्यापैकी उमंग पॅनलचे 13 पैकी 13
उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. उमंग पॅनलने सलग दुसर्यांदा विजय मिळवून इतिहास रचला आहे.
उमंग पॅनलचे दादा सलगर यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/australian-killer-whales-destroyed-karanyacha-decision/