मॅरेथॉनमध्ये Mumbai करांचा उत्स्फूर्त सहभाग 65 हजारांहून अधिक धावपटू रस्त्यावर; आमिर खान सहकुटुंब सहभागी
देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या टाटा Mumbai मॅरेथॉन 2026 ला आज (रविवार, 18 जानेवारी) उत्साहात सुरुवात झाली. पहाटेपासूनच Mumbai करांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विविध वयोगटांतील, व्यावसायिक धावपटूंसह सामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग सहभागी झाले होते. या वर्षी सुमारे 65 हजारांहून अधिक धावपटूंनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर जवळपास 70 हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली होती.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहाटे 5 वाजता हिरवा झेंडा दाखवत मॅरेथॉनला औपचारिक सुरुवात केली. ही मॅरेथॉन गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यत असून यावर्षी एकूण 3.54 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे.
पहिल्यांदाच कोस्टल रोडवरून धावण्याचा अनुभव
या वर्षीच्या Mumbai मॅरेथॉनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला आहे. 42.195 किमी आणि 21 किमी शर्यतीतील धावपटूंना Mumbai च्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडवरून धावण्याची संधी मिळाली.
Related News
अरबी समुद्राच्या साक्षीने, सूर्योदयाच्या आल्हाददायक वातावरणात धावताना धावपटूंमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला. अनेकांनी याला “आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव” असे संबोधले.
सेलिब्रिटींची उपस्थिती, सामाजिक संदेशाला बळ
सर्वसामान्य नागरिकांसह यंदाच्या मॅरेथॉनमध्ये अनेक नामवंत व्यक्तींनी सहभाग घेतला. अभिनेता आमिर खान याने आपल्या संपूर्ण कुटुंबासह ड्रीम रन मध्ये सहभाग घेतला. आमिर खानने मॅरेथॉननंतर प्रतिक्रिया देताना सांगितले,
“आज मी सहकुटुंब Mumbai मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आहे आणि मला खूप छान वाटत आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, नियमित व्यायाम करावा. आरोग्य हेच खरी संपत्ती आहे.” यावेळी त्याने पाणी फाऊंडेशनच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत सामाजिक उपक्रमांना मिळणाऱ्या प्रतिसादाचे कौतुक केले.
ओमर अब्दुल्लांची उपस्थिती; तरुणांना आरोग्याचा संदेश
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही Mumbai हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. माहीम येथून त्यांनी शर्यतीला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, “मी खूप दिवसांपासून मुंबई मॅरेथॉनबद्दल ऐकत होतो. आज स्वतः यात सहभागी झाल्याचा आनंद आहे. तरुणांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे, स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवू नये. दररोज खेळ आणि व्यायाम केला पाहिजे.”
Mumbai तील बदलांबाबत भाष्य करताना त्यांनी कोस्टल रोडसारख्या पायाभूत सुविधांचे कौतुक केले. “मी मुंबईत तीन वर्षे राहिलो आहे. त्या काळात कोस्टल रोडसारखी सुविधा उभी राहील, अशी कल्पनाही नव्हती. अशा सुविधा शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत,”
असे त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले, “निवडणूक म्हणजे कोणी जिंकतो, कोणी हरतो. ज्या पक्षाला बहुमत मिळाले आहे, त्यांची जबाबदारी आता Mumbai करांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आहे.”
विविध शर्यती, विविध वयोगटांचा सहभाग
टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा एकूण सहा प्रमुख शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या :
1) हौशी मॅरेथॉन (42.195 किमी)
सकाळी 5.00 वाजता
सीएसएमटी येथून सुरुवात
2) 10 किमी रन
सकाळी 6.00 वाजता
सीएसएमटी येथून सुरुवात
3) एलिट मॅरेथॉन (42.195 किमी)
सकाळी 7.00 वाजता
सीएसएमटी येथून सुरुवात
4) दिव्यांग मॅरेथॉन (1.6 किमी)
सकाळी 7.05 वाजता
सीएसएमटी येथून सुरुवात
5) ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन (4.2 किमी)
सकाळी 7.25 वाजता
सीएसएमटी येथून सुरुवात
6) ड्रीम रन (5.9 किमी)
सकाळी 8.15 वाजता
सीएसएमटी येथून सुरुवात
विशेषतः दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने उपस्थितांच्या डोळ्यांत कौतुक आणि प्रेरणा दोन्ही भाव दिसून आले.
आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक
Mumbai मॅरेथॉन ही केवळ स्पर्धा नसून ती आरोग्य, फिटनेस, सामाजिक एकोप्याचे प्रतीक बनली आहे. विविध सामाजिक संस्थांसाठी निधी संकलन, आरोग्याविषयी जनजागृती आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी ही मॅरेथॉन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रस्त्यांच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक, स्वयंसेवक, बँड पथके आणि जल्लोषामुळे संपूर्ण मुंबईत उत्सवी वातावरण पाहायला मिळाले.
टाटा मुंबई मॅरेथॉन 2026 ने पुन्हा एकदा Mumbai करांचा खेळ, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांप्रती असलेला उत्साह अधोरेखित केला आहे. कोस्टल रोडवरील ऐतिहासिक धाव, सेलिब्रिटींचा सहभाग आणि लाखो लोकांचा प्रतिसाद यामुळे ही मॅरेथॉन संस्मरणीय ठरली आहे. ही मॅरेथॉन म्हणजे केवळ धावण्याची शर्यत नाही, तर निरोगी भारताचा संदेश देणारी चळवळ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
read also:https://ajinkyabharat.com/indian-bike-scooters-record-growth/
