मुंबई : सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर आज सकाळी एक गंभीर अपघात झाला.
BEST च्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली.
या धडकेत बस आणि कारच्या मध्ये अडकून मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर महिलेला तातडीने जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बस आणि कार जप्त केली असून, अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.