एमपीएससी: कृषी सेवेच्या 258 जागांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र लोकसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कृषी विभागातील

258 पदांसंदर्भातील मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासन सेवेतील

एमपीएससी कक्षेतील सरळ सेवेच्या पदांच्या मागणीचे पत्र विनाविलंब

Related News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्याबाबत शासनाने निर्णय जारी

केला आहे. त्यामुळे एमपीएससी मार्फत कृषी विभागातील परीक्षा देणाऱ्या

विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले असून उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या परीक्षेबाबत तांत्रिक अडचणी येत असल्याने 20 ऑक्टोबर 2022 चे

परिपत्रक राज्य शासनाकडून रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित

नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलल्यानंतर कृषी विभागाच्या

258 जागा यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली होती.

मात्र यासंदर्भात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ऑक्टोबर 2022 चे ते परिपत्रक

आता रद्द करण्यात आले आहे. हे परिपत्रक रद्द केल्यानंतर आता कृषी विभागाच्या

258 जागा संदर्भात लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहितीही

पुढे आली आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची

तारीख पुढे ढकलल्यानंतर आता नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

त्याशिवाय कृषी विभागातील 258 जागांचा सुद्धा यामध्ये समावेश असण्याची

शक्यता आहे आणि तशा प्रकारची जाहिरात लवकर जारी केली जाईल, असेही यात म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/red-alert-issued-for-rain-in-many-places-including-mumbai/

Related News