अकोट : स्थानिक श्रीजी कॉलनी परिसरातील सेंट पॉल्स अकॅडमी, अकोट येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी मातृ-पितृ पूजन दिवस मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आई-वडिलांविषयी कृतज्ञता, आदर आणि प्रेमाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनीत लखोटीया आणि लुणकरन डागा होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद चांडक उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल तसेच पर्यवेक्षक अभिजीत मेंढे, मालती महाले, सारिका रेळे आणि वैशाली गावत्रे यांची मंचावर उपस्थिती लाभली.
मातृ-पितृ पूजन दिनाचा कार्यक्रम श्री योग वेदांत सेवा समिती, अकोट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. समितीचे सदस्य सतीश गुप्ता, राकेश मनवाणी, जीवन पाटील, गजानन मोहोळ, माधुरी नाथे आणि भारती भुस्कट यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
Related News
JEE Main 2026 सेशन 2 परीक्षा उद्यापासून; फोटो आयडीशिवाय प्रवेश नाही, दागिने–स्टोल घालण्यास मनाई
JEE Main 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्...
Continue reading
भारतातील शिक्षणाचा केंद्रबिंदू: उत्तर प्रदेश – ८४ विद्यापीठे आणि ८११४ महाविद्यालयांसह ‘एज्युकेशन हब’
भारताच्या प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात शैक्षणिक संस्थांचा मोठा जा...
Continue reading
अकोट तालुक्यातील मौजे चंडिकापूर येथे पंधरावा वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या नाली व पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ...
Continue reading
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका सहावीच्...
Continue reading
ईदच्या आनंदोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ खूप चर्चेत आहे. रॉबिन झायन नावाच्या एका मुस्लीम मुलानं इफ्तार पार्टीत रोजा सोडण्याआधी सुरेल आवाजात श्री गणेश व...
Continue reading
राम नवमी 2026 कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पारंपरिक पदार्थ
हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेली राम नवमी भक्तिभाव, श्र...
Continue reading
कुही तालुक्यातील देवळी कला येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार; चाईल्ड हेल्पलाईनच्या हस्तक्षेपानंतर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर जिल्ह्या...
Continue reading
अकोट तालुक्यातील आंबोडा गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अकोट ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेत...
Continue reading
हैदराबादमध्ये दिमाखदार रिसेप्शन: रश्मिका मंधान्ना–विजय देवरकोंडा यांच्या सुवर्ण दागिन्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी
Continue reading
अकोट नगरपालिकेत दोन महिने आधी भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम यांच्यात झालेल्या स्थानिक युतीने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवल...
Continue reading
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात गेल्या काही दिवसांपासून गौणखनीज, माती आणि वाळू चोरीसाठी माफियांची सक्रियता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दहिहांडा
Continue reading
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा रोहनकर आणि भरत तेवाणी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. यावेळी देवेंद्र बोडखे यांनी आपल्या भाषणातून आई-वडिलांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पालकांचा सन्मान राखण्याचे आणि त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. भरत तेवाणी यांनी मातृ-पितृ पूजनाची योग्य पद्धत समजावून सांगत या दिवसाचे सांस्कृतिक आणि नैतिक महत्त्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भावनिक वातावरणात अनेक पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अशा कार्यक्रमांमुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतात, असे मत पालकांनी मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी माधुरी मानकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिक्षिता चोपडे, आनंद काळमेघ, सुदर्शन अंभोरे, शुभम कळसकर, वैभव हिंगणकर, नारायण वानखडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच संस्कारक्षम शिक्षणाची जपणूक करणारा ठरला.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-breakthrough-in-akola-molestation-case-200-cctv-cameras-caught-the-accused/