अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात विषबाधेमुळे 50 हून अधिक शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेळीपालनावर उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, नुकसानग्रस्तांनी तातडीने शासनाकडून मदतीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरशेवडी शेतशिवाराकडे जाणाऱ्या मार्गावरील फाटकाची शेवडी परिसरात शेळ्या चारत असताना अचानक त्यांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. शेळ्या चारणाऱ्या ढोरकी यांनी तातडीने परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने काही शेळ्यांना हिवरखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले. मात्र, अनेक शेळ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अबोली कथे आणि कर्मचारी राजेश वायकर यांनी विषबाधाग्रस्त शेळ्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या वेळी बजरंग तिडके, अन्सार खान, संतोष पटोळे, अर्जुन खिरोडकर, प्रणव इंगळे, संतोष मानकर, आबिद खान, दत्तू धुरदेव आणि राजेश राजनकार यांनी मदत केली. मात्र, मोठ्या प्रमाणावर विषबाधा झाल्याने अनेक शेळ्यांना वाचविणे शक्य झाले नाही.
Related News
ChatGPT चे 5 भन्नाट फीचर्स; विद्यार्थ्यांच्या अभ्यासात AI ची नवी मदत, पालकांनाही मिळणार नियंत्रण
ChatGPT : विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आर्टिफिशियल इंटे...
Continue reading
शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
विधीमंडळातील संख्याबळाच्या चाचणीवर शिंदे गटाचा भर; ‘विवेकाधिकाराचा...
Continue reading
फडणवीसांचा ठाकरेंना टोला; ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनावरून म्हणाले, “हे नाकार्त्यांचं आंदोलन”
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमं...
Continue reading
जीआर आला! मराठा आरक्षणासाठी सरकारचा मोठा निर्णय; शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी नवी जागा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि साम...
Continue reading
Manoj Jarange Patilचा तिसऱ्यांदा अर्ज; मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळणार का? महत्त्वाची अपडेट समोर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Pa...
Continue reading
Manoj Jarange Patil मुंबईकडे रवाना; पहिला मुक्काम पाटोदा, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
आंतरवाली सराटीतून ताफा मुंबईच्या दिशेने रवाना; आझाद मैदानातील उपोषणासाठी अद्याप परवानगी नाही, Ma...
Continue reading
मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा; आंदोलन थांबणार नाही, मुंबईकडे मराठे कूच करणार
उपोषणाचा १६वा दिवस; जवळच्या सहकाऱ्याला त्रास दिल्याचा जरांगेंचा आरोप, मुसळधार पाऊस असला तरी मुंब...
Continue reading
SBI UPI Loan : UPI व्यवहारांवर मिळणार कर्ज! SBI आणतंय नवा पर्याय; GST नसतानाही मिळू शकतो फायदा
SBI UPI Loan : छोट्या व्यापाऱ्यांसाठी आणि लघु व्या...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनो...
Continue reading
मराठ्यांचं वादळ पुन्हा मुंबईच्या दिशेने; मनोज जरांगे पाटलांची अंतरवालीतून मोठी घोषणा, असा आहे आंदोलनाचा A to Z प्लॅन
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी...
Continue reading
मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनापूर्वी मोठी खलबतं; फडणवीस-बावनकुळे बैठक, तोडगा निघणार?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची श...
Continue reading
एक सरकार BRICSमध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय; संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरा...
Continue reading
घटनेनंतर मंडळ अधिकारी डी. आर. झापे, तलाठी समीर खान आणि मोहन कुलाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नगरपरिषदेने मृत शेळ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबीची व्यवस्था केली. तसेच ठाणेदार सचिन पाटील आणि पोलिस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली.
भाजपचे रमेश दुतोंडे यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे पंचनामा सादर करून नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, विषबाधेचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने त्वरित मदतीचा हात द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त मजूर कुटुंबांकडून होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/villagers-upset-due-to-chatareet-pushy-type-of-drinking-water-tank-and-rotten-birds-10-serious-questions/